कोळेश्वर ट्रेक ७ जुलै २०२४
भ्रमंती मधील सांगाती
- डॉ. सचिन जोशी
- प्रसाद जोशी
- हेमंत मांडके
- विनायक साठे
- भालचंद्र फाटक
- राहुल डहाळे
- आणि ऋषिकेश वाघ
जवळपास एक महिन्याचा विश्रांती नंतर आज पाय पुन्हा सह्याद्री कडे वळले. 'कोणता ट्रेक करायचा?' या वर जरा वेगवेगळे विचार सचिन कडून झाल्यावर शेवटी वाई जवळ कोळेश्वर पाहून येऊ असा फोन केल्यावर लगेच सर्व जण तयार झाले.
पहाटे ५:३० ला सचिन च्या घरा जवळ भेटायचे ठरले. त्यानुसार ५:०५ वाजता फाटक काकांना फोन करून नॅनो ला स्टार्टर मारला आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन सचिन कडे निघालो. साडे पाच ला सचिन च्या घरापाशी जाऊन आम्ही तिघे मार्गस्थ झालो. दरम्यान राहुल चा गाडी मध्ये जोशी काका, हेमंत आणि विनायक येऊन आम्हाला पासलकर उड्डाण पुलाजवळ सामील झाले.
पुढे वाई मधील हॉटेल मातोश्री मध्ये नाश्ता साठी थांबून त्याचा आस्वाद घेतला.
पुढे मेणवली वेस ओलांडून गाडी जांभळी गावाकडे गावाकडे निघाली. मेणवली, धोम सारखी प्रसिद्ध गावे ओलांडून पुढे जांभळी गावात पोहोचलो असता पावसामुळे पुढील रस्ता बंद आहे हा साक्षात्कार झाला. गावकर्यांनी दुसऱ्या अंगाने किरुंडे गावातून वाट जाते त्या मार्गे जा असा सल्ला दिल्याने गाडी त्या दिशेला नेली.
किरुंडे गावात पद्मावती मंदिरामागे गाड्या लावून आम्ही ट्रेक सुरु केला. गावकर्यांना रस्ता विचारला असता दोघे जण दूध टाकायला आलेले आहेत ते पुन्हा जातील वरच्या वाडी वर असे सांगितले आणि त्यांच्या बरोबर जा असा सल्ला दिला. त्यांना वेळ लागत असल्याने आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. पावसाळी वातावरणात धुके आणि गवत या मुळे वाट चुकली. मधल्या सोंडेवरून मार्ग क्रमण करत असताना वाटेच्या खुणा, खोदीव पायऱ्या दिसत असून देखील ही वाट इतक्यात वापरात नाही, मळलेली नाही आणि सध्या वापरात असेलेली वाट डावीकडील सोंडेवरून जाते हा साक्षात्कार घडला. मग दोन छोटे ओढे ओलांडत त्या वाटेवर लागलो. तोवर लाल साडी नेसलेल्या गवळण मावशी हिरव्या पार्श्व भूमीवर उठून आमच्या दिशेने येताना दिसल्या आणि हीच वाट बरोबर आहे या वर शिक्कामोर्तब झाले. मावशीं बरोबर गप्पा मारत पुढची वाटचाल सुरु ठेवली.
No comments:
Post a Comment